वृक्षाथॉन मॅरेथॉन २०२५: पर्यावरण दिनानिमित्त पुणे पोलिस, वन विभाग आणि वृक्षाथॉन फाऊंडेशनचा उपक्रम
लोक समाचार– राज राठोड
पुणे: पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत पुणे पोलिस, वन विभाग पुणे आणि वृक्षाथॉन फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे वृक्षाथॉन मॅरेथॉन २०२५ चे आयोजन केले आहे. १ जून २०२५ रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनचा उद्देश नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीचे महत्त्व आणि निसर्ग संवर्धनाबद्दल जनजागृती करणे हा आहे.
ही स्पर्धा २०१८ पासून सुरू असून यंदा चौथे वर्ष आहे. देशभरातील १०,००० हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभाग घेणार असून प्रत्येक स्पर्धकाला,वन विभागामार्फत एक रोपटे मोफत देण्यात येणार आहे. रोपट्याची काळजी कशी घ्यावी, हे देखील मार्गदर्शनाच्या माध्यमातून स्पष्ट केले जाणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप व पारितोषिके. स्पर्धा ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा चार प्रकारात होणार आहे. तसेच १८ ते ३०, ३१ ते ४५, ४६ ते ६० आणि ६१ वर्षांवरील अशा चार वयोगटांमध्ये स्पर्धकांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
पर्यावरण पूरक पारितोषिके.- विजेत्यांना इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक सायकल आणि लाखोंचे बक्षिसे मिळणार आहेत.- प्रत्येक सहभागी स्पर्धकाला T-shirt, Bibs, Goodie Bag, Snacks आणि Water Bottle दिले जाणार आहे.- हायड्रेशन पॉइंट, वैद्यकीय पथक, अॅम्ब्युलन्स आणि स्वयंसेवकांची विशेष व्यवस्था असणार आहे.
मॅरेथॉन मार्ग आणि वाहतूक बदल स्पर्धेचा मार्ग, ३ किमी – पोलीस मुख्यालय शिवाजीनगर ते चतुश्रुंगी चौक आणि परत,
५ किमी – पोलीस मुख्यालय शिवाजीनगर ते एनसीएल मंदिर आणि परत
१० किमी – पोलीस मुख्यालय शिवाजीनगर ते डीआरडीओ गेट आणि परत
२१ किमी – पोलीस मुख्यालय शिवाजीनगर ते चांदणी चौक आणि परत
वाहतूक बदल, स्पर्धेच्या दिवशी निर्दिष्ट मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. पुणे वाहतूक शाखा यासंबंधी माहिती लवकरच जाहीर करणार आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी निसर्ग संवर्धनासाठी आपल्या सहभागाची नोंद करा नोंदणीसाठी www.vrukshathon.com](https://www.vrukshathon.com या लिंकला भेट द्या आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा.