भारती विद्यापीठ पोलिसांकडून वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक
लोक समाचार–राज राठोड
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहन चोरीचा कट उघड करत दोन रिक्षा आणि एक दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी सय्यदनगर, हडपसर येथे राहणाऱ्या माजीद युनुस अन्सारी (वय २२) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस तपासात समोर आले की, आरोपीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरी करून त्या कात्रज-कोंढवा रोडवर असलेल्या एका ठिकाणी लपवून ठेवले होते. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने आरोपीला पकडले आणि गुन्ह्याचा छडा लावला.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर आणि त्यांच्या टीमने उल्लेखनीय कामगिरी बजावली.
अधिक माहिती अशी की
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार यांना वाहन चोराचा शोध घेणेबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकातील पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर हे वाहन चोरांचा शोध घेत असताना त्यांना आरोपी नामे माजीद युनुस अन्सारी, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर २२, सय्यदनगर, हडपसर, पुणे याने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतुन रिक्षा व दुचाकी गाड्या चोरी करुन त्या कात्रज कोंढवा रोडवरील पेरुची बाग येथे लावुन ठेवल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोड, पेरुची बाग येथे जावुन पाहता तेथे आरोपी नामे माजीद युनुस अन्सारी, वय २२ वर्षे, रा. गल्ली नंबर २२, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा मिळुन आला असुन त्याचेकडुन २ तीन चाकी रिक्षा व १ दुचाकी गाडी जप्त केली असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील वाहन चोरीचे २ गुन्हे उघड झाले आहे, व १ येरवडा पोलीस स्टेशन येथील,
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार तुकाराम सुतार, संदीप आगळे, मंगेश पवार, महेश बारवकर, सचिन सरपाले, सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, किरण साबळे, निलेश खैरमोडे यांच्या पथकाने केली आहे.