तळजाई वनउद्यानात धारदार शस्त्राचा धाक दाखवून दीड लाखांची सोन्याची चेन चोरी, परिसरात गांजा व दारुड्यांचा सुळसुळाट कायम
लोक समाचार – राज राठोड
पुणे : तळजाई वनउद्यान, दि.२० मे रोजी १७ वर्षे मुलाला धारदार हत्याराचा धाक दाखवून त्याच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन जबरी चोरी करून, दोन आरोपी पसार झाल्याची माहिती समोर आली आहे,
या ठिकाणी २ सीसीटीव्ही कॅमेरे असून,ते देखील बंद असल्याची माहिती मिळाली आहे, या संदर्भात सहकार नगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
तळजाई वन उद्यान या ठिकाणी आजूबाजूला, दारूचे मोकळ्या बाटल्या व गांजा पिण्यासाठी वापरलेले सिगारेट सारखे पांढरे कागद पडून आहेत,
या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी दारू व गांजा पिणाऱ्यांनी आपला अड्डा बनवून ठेवला आहे, पुणे शहरामध्ये शांत आणि झाडाझुडपांनी गजबजलेला हा परिसर असून, या परिसरामध्ये शांत व सुंदर तळजाई माताचे मंदिर आहे, सध्या या परिसरामध्ये दारुड्यांनी व गांजा पिणाऱ्यांनी आपला अड्डा बनवून ठेवला आहे,
दारू व गांजा पिणाऱ्यांच्या मनामध्ये पोलिसांची काहीच भीती राहिली नाही असे या परिसरामध्ये मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले,
एका ज्येष्ठ महिलेने सांगितले की,
यासंदर्भात दारू पिणाऱ्यांना व गांजा पिणाऱ्यांना या ठिकाणी तुम्ही दारू पिऊ नका व गांजा पिऊ नका असे म्हटले तर ते, अंगावर धावून येतात, बऱ्याच वेळा महिलांची व मुलींची छेड सुद्धा काढतात, माझ्याबरोबर माझी मुलगी असते त्याच्यामुळे मला भीती वाटते, तळजाई मंदिराच्या येथे संध्याकाळी फिरायला येणाऱ्या एका जेष्ठ महिलेने सांगितले.
जितू माने, राहणार. सहकार नगर,
यांनी सांगितले, हा परिसर पहिले असा नव्हता, परंतु काही वर्षापासून, तळजाई मंदिर या परिसरात, बऱ्याच ठिकाणी दारू पिऊन या रस्त्यावरून तरुण दुचाकी वाहनांची रेस लावतात आणि दुचाकी वाहन भरधाव वेगाने चालवतात, यांच्या धडकेत काही लोकांनी आपला जीव देखील गमावला आहे, यावर पोलिसांनी नाकाबंदी करून दारू पिऊन भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून या परिसरामध्ये टवाळगिरी करणाऱ्या टोळक्यांवर पोलिसांची भीती राहील.
बऱ्याच वेळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी या संदर्भात तक्रार केल्याचे म्हटले जाते परंतु, या परिसरामध्ये दारू पिणाऱ्यांवर पोलिसांची भीती राहिली नाही का, असा प्रश्न निर्माण होतो.
जर का या परिसरामध्ये गांजा पिणारे दारू पिणारे पोलिसांनाच घाबरत नसतील तर, महिलांची छेड काढण्यासारखे प्रकार, व धारदार हत्यारे घेऊन भीती दाखवून लूटमार सारखे प्रकार घडत असतील तर यात नवल काय, असाही एक प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनी सदर या ठिकाणी गस्त वाढवून या दारुड्यांचा व गांजा पिणाऱ्यांचा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून या परिसरामध्ये, सकाळ संध्याकाळी फिरायला येणाऱ्या, तरुण-तरुणी, महिला, लहान मुले, यांच्या मनामध्ये सुरक्षितता असेल.)