लोक समाचार – राज राठोड
पुण्यातील कोंढवा परिसरातील टिळेकरनगर येथे मदतीच्या बहाण्याने सोनसाखळी लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १८ जून २०२५ रोजी रात्री १० च्या सुमारास , पावसाचे पाणी या ठिकाणी जमले होते, रस्त्यावरील खड्ड्याचा अंदाज न आल्याने श्रीराम चौकाजवळील खड्ड्यात दुचाकी घसरल्याने, फिर्यादी व त्यांची पत्नी दुचाकी वरून खाली पडले,
याच अपघाताचा फायदा घेत दोन अनोळखी व्यक्तींनी मदत करण्याचे भासवत फिर्यादी यांच्या गळ्यातील अंदाजे ७५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी काढून घेतली आणि दुचाकीची चावीही काढून पळ काढला.
हा प्रकार घडत असताना पती-पत्नी हे स्वतःला सावरेपर्यंत चोरटे पसार झाले, जाता जाता चोरट्यांनी फिर्यादी यांच्या वाहनाची चावी काढून नेली, त्यामुळे त्याचा पाठलाग करणेही शक्य झाले नाही.कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी सांगितले की, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा लवकरच छडा लावण्यात येईल, तपास सुरू आहे.
अपघाताच्या घटनांमध्ये मदतीच्या नावाखाली लूट करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी अशा प्रसंगी सतर्क रहावे