लोक समाचार – राज राठोड
सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्वारगेट बस स्थानकावरून गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीस पकडून आणखी दोघांना अटक; इनोव्हा गाडीत मोठा साठा सापडला,
पुणे – पोलीसांनी अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत एकूण १६ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १९ जून २०२५ रोजी संध्याकाळी स्वारगेट बस स्थानक येथे पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस अंमलदार राहुल होळकर व विक्रम सावंत यांना मिळालेल्या माहितीवरून स्वारगेट एस.टी. स्थानकावर एक संशयित इसम गांजासह असल्याची खबर मिळाली. पोलीसांनी सापळा लावून त्या इसमाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून गेला. परंतु पोलीसांनी पाठलाग करत त्याला तात्काळ अटक केली. त्याचे नाव नितीन नरसिंह पाल (वय २३, रा. सोलापूर) असे आहे.
त्याच्याकडे असलेल्या चॉकलेटी रंगाच्या बॅगेत ६ किलो गांजा (किंमत – १लाख २१हजार) सापडला. पुढील तपासात नितीनने दोन साथीदारांची नावे उघड केली – अल्ताफ तांबोळी (वय २८) व विठ्ठल ऊर्फ दादा शिवपाल (वय ३१) – हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील वेळापूरचे रहिवासी आहेत.
त्यांच्या इन्नोव्हा क्रिस्टा (MH-45-AD-3333) गाडीत मोठ्या प्रमाणावर गांजा लपवलेला असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून वेळापूर, पंढरपूर येथे शोधमोहीम राबवण्यात आली.
या कारवाईत जप्त केलेला एकूण मुद्देमाल –
६ किलो गांजा – १लाख २१हजार
इनोव्हा गाडी – १५ लाख
३ मोबाईल फोन – २५ हजार
एकूण जप्त मुद्देमाल – १६लाख ४६हजार
पुढील तपास पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. अंमली पदार्थाच्या विरोधात पोलीसांची ही मोठी कारवाई ठरली आहे.
सदरची कामगिरी मा.अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, यांचे मार्गदर्शनाखाली राहुल आवारे सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग यांनी कारवाई कामी नेमलेल्या विशेष पथकातील, संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक, गुन्हे बंडगार्डन पो.स्टे. पोलीस उपनिरीक्षक सुर्यकात सपताळे, पोलीस अंमलदार राहुल होळकर, विक्रम सांवत, फिरोज शेख, सुजय पवार, नवनाथ शिंदे तसेच महिला पोलीस हवालदार प्रिती मोरे, सुजाता दांगट, सहा. पो. फौ. राजेश गोसावी, विजय लोयरे यांच्ची पथकाने केली आहे.