सायबर फसवणुकीचा पर्दाफाश: पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई
लोक समाचार – राज राठोड
पुणे पोलिसांनी अमेरिकन नागरिकांना ‘डिजिटल अटक’ करण्याची धमकी देऊन लाखो डॉलर्सची फसवणूक करणाऱ्या खराडी येथील एका कॉल सेंटरवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.
पुणे शहरातील खराडी येथील प्राईड आयकॉन बिल्डिंगमध्ये सुरु असलेल्या ‘मॅग्नेटेल बीपीएस अॅण्ड कन्सल्टंट्स एलएलपी’ या अनाधिकृत कॉल सेंटरवर पुणे सायबर पोलिसांनी छापा टाकला. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना त्यांच्या अॅमेझॉन खात्याचा गैरवापर झाला असून ड्रग्ज तस्करीमध्ये त्यांचे नाव आल्याचे सांगून ‘डिजिटल अटकेची’ भीती दाखवली जात होती.
फसवणुकीची कार्यपद्धती आणि आरोपी
मिळालेल्या माहितीनुसार, हे कॉल सेंटर सायंकाळी ६ ते पहाटे २ या अमेरिकन वेळेनुसार चालवले जात होते. यात १११ पुरुष आणि १२ महिला कर्मचारी काम करत होत्या. हे कर्मचारी व्हिपीएन सॉफ्टवेअर आणि संशयास्पद ॲप्लिकेशन्सचा वापर करून अमेरिकन नागरिकांना गिफ्ट कार्ड्स विकत घेण्यास भाग पाडत होते. ही गिफ्ट कार्ड्स आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरत होते. त्यांच्या लॅपटॉपमध्ये अमेरिकन नागरिकांच्या मोबाईल क्रमांकाचा लाखो संख्येने डेटा आढळला आहे.
या प्रकरणी सरजितसिंग गिरावत सिंग शेखावत, अभिषेक अजयकुमार पांडे, श्रीमय परेश शहा, लक्ष्मण अमरसिंग शेखावत आणि अॅरोन अरुमन खिश्चन या ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी रा खराडी, पुणे. मुळ रा अहमदाबाद, गुजरात, व एक राजस्थान येथील आहेत,
जप्त केलेला मुद्देमाल आणि पुढील तपास
पोलिसांनी या छाप्यात ६४ लॅपटॉप, ४१ मोबाईल फोन, ४ राउटर, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आणि फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्क्रिप्टची कागदपत्रे असा एकूण १३लाख ७४हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीतील कनेक्शन उघड झाले असून, फसवणुकीची रक्कम हवाला किंवा क्रिप्टोकरन्सीद्वारे फिरवली जात असल्याचा संशय आहे.
पुणे पोलीस या गुन्ह्याचा सखोल तपास करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेशकुमार, मा. पोलीस सह आयुक्त रंजनकुमार, मा. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) निखिल पिंगळे, मा. पोलीस उप आयुक्त (आर्थिक व सायबर), विवेक मासाळ सहा. पोलीस आयुक्त गुन्हे-१ गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सायबर पो. ठाणे, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उप निरीक्षक, तुषार भोसले, पोलीस उपनिरीक्षक संतोष तानवडे, पोलीस उपनिरीक्षक राम दळवी, पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार कैलास चव्हाण, सहा. पोलीस फौजदार अविनाश इंगळे, पोलीस अंमलदार होले, वाघमारे, विजय पवार, बाळासाहेब सकटे, निलेश जाधव, हरीष मोरे, पोलीस अंमलदार विशाल इथापे, देविदास वांढरे, अमित जमदाडे, पो. अमंलदार ऋषिकेश व्यवहारे, निखीलजाधव, महिला पोलीस अंमलदार सीमा सुडीत, स्मिता हंबीर, जान्हवी मडेकर, पोलीस अंमलदार संदीप पवार, मांढरे, दिनेश मरकड, सचिन शिंदे, प्रविण रजपुत यांनी सदरची कामगिरी केली आहे.