पुणे महापालिकेच्या आरोग्य सेवा केंद्रात २१ हजारांहून अधिक वारकऱ्यांना मोफत तपासणी आणि औषधोपचार
लोक समाचार – राज राठोड
पुणे : आषाढी वारी निमित्त पुणे महानगरपालिकेच्या वैद्यकीय मदत कक्षामार्फत आज एकूण २१,१५१ वारकरी बांधव व भगिनींना मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार करण्यात आले. विविध वैद्यकीय मदत केंद्रांवर वारकऱ्यांची दिवसभर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.
छोट्या-मोठ्या वैद्यकीय तक्रारींसाठी आलेल्या वारकऱ्यांची डॉक्टरांच्या टीमकडून तत्परतेने तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली, त्यामुळे समाधानाने माऊली माऊली, म्हणत ते पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाले.
या सेवेमध्ये मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विकास) श्री. ओमप्रकाश दिवटे, डॉ. बोराडे मॅडम तसेच आरोग्य विभागातील डॉक्टर्स व त्यांच्या सहकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.
पुणे महानगरपालिका वारकऱ्यांच्या सेवेसाठी कटीबद्ध असून, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या सुविधांमुळे वारकऱ्यांना वारीचा अनुभव अधिक सुखकर होईल ,पुणे महापालिकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, वारकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेमुळे वारीचा प्रवास अधिक सुखकर होत आहे, असे प्रतिपादन अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केले.