पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवल किशोर राम रुजू
लोक समाचार – राज राठोड
पुणे: आज पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार श्री. नवल किशोर राम यांनी स्वीकारला. पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडून त्यांनी हा पदभार स्वीकारला. डॉ. भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. राम यांचे स्वागत केले.
पदभार स्वीकारल्यानंतर श्री. नवल किशोर राम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पुणे महानगरपालिकेत काम करण्याची त्यांना उत्तम संधी मिळाली आहे. तसेच, ते सर्वांना सोबत घेऊन काम करतील अशी ग्वाही दिली.
यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.