लोक समाचार – राज राठोड
पुणे, दिंडी सोहळ्याच्या धार्मिक आणि पवित्र वातावरणात मोबाईल चोरी करून गोंधळ उडवणाऱ्या चोरट्यांना मार्केटयार्ड पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी हे पूर्वीही गुन्हे केलेले रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्या ताब्यातून मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
१)प्रकाश देवराम परिहार (वय २९, रा. लोहियानगर, पुणे) – रेकॉर्डवरील गुन्हेगार
२)मोहम्मद मनान जमाल शेख (वय २५, रा. मार्केटयार्ड, पुणे)
या दोघांना अटक करण्यात आली आहे,
दिंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर २० जून रोजी शारदा गजानन मंदिराजवळ काही वारकऱ्यांचे मोबाईल चोरीस गेले होते. याबाबत पीडितांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनिषा पाटील यांनी तत्काळ तपास पथकाला सूचना दिल्या.
तपास पथकात पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जावध, राऊत, लोणकर आणि बीट मार्शल यांच्या समावेशाने पेट्रोलिंग करत आरोपी प्रकाश परिहार याला ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता त्याने मोबाईल चोरीचे कबुल केले. त्याच्या माहितीवरून साथीदार मोहम्मद शेखलाही अटक करण्यात आली.
दोनही आरोपींकडून चोरीला गेलेले मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मार्केट यार्ड पोलिसांच्या तत्परतेमुळे काही तासातच मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळण्यात यश.
सदरची कारवाई, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परि ५ पुणे शहर, डॉ राजकुमार शिंदे, सहा पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिता नवले यांचे आदेशाने तपास पथकातील पोलीस अंमलदार थोरात, कौस्तुभ जावध, राऊत व निगराणी पथकातील अंमलदार लोणकर तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील बीट मार्शल वरील अंमलदार यांनी केली आहे.