अल्पवयीन मुलाकडून गावठी पिस्टल व १ जिवंत राऊंड जप्त
लोक समाचार – राज राठोड
पुणे: भारती विद्यापीठ पोलिसांकडून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १ गावठी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत राऊंड हस्तगत करून सदर अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अल्पवयीन मुलगा वय १७ हा कात्रज कडून मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पिस्टल घेऊन थांबल्या असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत राऊंड असे मिळून आले, पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहे.
अधिक माहितीसाठी
दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना माहिती मिळाली की कात्रजकडुन मांगडेवाडीकडे जाणा-या रोडवर असलेल्या रतन मोटर्स, पुणे या कंपनीच्या समोरील बाजुस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबला आहे अशी बातमी मिळाली, मिळालेल्या माहितीवरून पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी रतन मोटर्स प्रा लि पुणे या कंपनीच्या समोरील बाजुस रोडवर जावुन पाहता तेथे एक विधीसंघर्षीत बालक, वय १७ वर्षे, हा त्याचे ताब्यात ५०,००० रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ५०,५००/-रुपयांचे मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २२९/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.)