लोक समाचार – राज राठोड
पुणे: पुणे शहर पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलले आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी यश विजय चांदणे (वय २२, रा. पठाण चाळ, बोपोडी, पुणे) याच्याविरोधात महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम (MPDA) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत चांदणेला १ वर्षासाठी बुलढाणा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या यश चांदणेवर MPDA कायद्यान्वये कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार, १६ जून २०२५ रोजी त्याला १ वर्षाकरिता बुलढाणा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले.
या आदेशाची अंमलबजावणी १९ जून २०२५ रोजी करण्यात आली. खडकी पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध, शांततामय आणि कायदेशीर मार्गाने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली.
खडकी पोलीस स्टेशनने MPDA अंतर्गत केलेली ही कारवाई गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे आणि ठोस पाऊल आहे.
खडकी पोलीस स्टेशन पुणे शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि त्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर यापुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरूच राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
ही यशस्वी कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर,
रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त,
मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, हिंमत जाधव, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४, विठ्ठल दबडे, सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग,
दिलीप फुलपगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन
कारवाईतील अधिकारी व कर्मचारी,
पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले
पो.ह.वा. बी.डी. शेवरे, महिला पोलीस अंमलदार स्वाती म्हस्के (सर्व्हेलन्स विभाग), पो.शि. विकास धायतडक, महिला पो.ह.वा. जया थिटे, पो.ह.वा. नवनाथ शिंदे.