लोक समाचार – राज राठोड
पुणे, २४ जून: काळेपडळ पोलिसांनी वाहन चोरीच्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश करत, एकूण ₹४,५७,०००/- किमतीची पाच दुचाकी आणि एक रिक्षा जप्त केली आहे. मोहम्मद नजीम जमील सलमानी, रा. सय्यदनगर, हडपसर (मूळ रा. करनाळगंज, लखनौ, उत्तरप्रदेश) या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील )यांनी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या, त्याच अनुषंगाने दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि महादेव शिंदे यांना माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपी मोहम्मद नजीम जमील सलमानी याला चोरीच्या वाहनासह ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीत, मोहम्मद सलमानी याने नमूद गुन्हे आणि यापूर्वीही अनेक दुचाकी व रिक्षा चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये एकूण ₹४,५७,००० किमतीचा मुद्देमाल आहे.
या धडाकेबाज कारवाईमुळे काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेले अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात वाहन चोरांना आळा घालण्यास मदत होईल अशी आशा आहे.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मागदर्शना खाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग, पुणे शहर, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस हवालदर प्रविण काळभोर, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, श्रीकृष्ण खोकले, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.