काळेपडळ पोलिसांनी केवळ २४ तासांत चोरट्याला अटक करत १ लाख ३०हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने वाईन शॉप मधून विदेशी दारूच्या बाटल्या चोरल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे,
पोलिस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांना मिळालेल्या बातमीवरून कारवाई करत संशयित अर्पित सुनिल अंधारे (वय १९) याला लावण्य हॉटेलजवळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील मोपेडच्या डिक्कीत विदेशी दारूच्या बाटल्या व कटर मशिन सापडले. आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास चालू आहे
सदरची कामगिरी ही ,राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो. हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पो.अं. श्रीकृष्ण खोकले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, नितीन ढोले व प्रदिप बेडीस्कर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.