बुद्ध पौर्णिमा: जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती येरवडा येथे उत्साहात साजरी
लोक समाचार – राज राठोड
पुणे : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५८७ व्या जयंतीनिमित्त येरवडा येथील दीक्षांत बुद्ध विहार येथे सामुदायिक बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध जयंती निमित्त, विविध कार्यक्रम आयोजित केले प्रार्थना, ध्यान, आणि सांस्कृतिक कार्यक्रम समाविष्ट केले गेले.
यानिमित्त पाहुण्यांच्या हस्ते खीर वाटप करण्यात आली ५०० हून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला. तसेच जगाच्या कल्याणासाठी भगवान गौतम बुद्ध यांचे विचार गरजेचे असल्याचे या वेळी मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी सांगितले.
दीक्षांत बुद्ध विहार यांच्यामार्फत वेळोवेळी गोरगरिबांना अन्नधान्य व सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याकरिता सदैव तत्पर असतात. येरवडा परिसरामध्ये एक चांगलं युवा संघटन व मुलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणारे व्यासपीठ उभे केलेले आहे. तरी सर्वांना आवाहन करीत आहोत की आपण आपल्या समस्या व अडचणी आमच्याकडे घेऊन यावे व आमच्या संस्थेच्या मार्फत निश्चित त्याचे निवारण करू. समाजामध्ये चांगले विचार व सगळ्यांमध्ये एकोपा राहवा ही संस्थेची भावना आहे.
असे विचार दीक्षांत बुद्ध विहार चे संस्थापक अध्यक्ष बापू खरात यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, बापू खरात, भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन धिवार, आनंद गोयल, सुनील जाधव, महेश पाटील, मिलिंद गायकवाड, आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यश चव्हाण, सनी कांबळे, संदीप चांदणे, बापू जाधव, दाऊद शेख, रोहन लोंढे, राकेश मोहिते, रोहित वैराळ, ऋषी गायकवाड, सुहास कांबळे, सुमित अवचरे, सुनील मलके, विनोद मोरे, विलास पाटील, संजय सात्रस, लाला कदम उपस्थित होते.)