भारती विद्यापीठ पोलिसांकडून घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेले ५ लाख ६० हजाराचे सोन्याचे दागिने, हस्तगत
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपीचा वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबतचे मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, अभिनय चौधरी यांना सदरचा गुन्हा विधीसंघर्षीत बालकाने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन नमुद गुन्हयातील चोरी केले ५लाख ६०हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार यांच्या पथकाने केली आहे.