Bablu( Raj )Rathod, Lok Samachar-Pune
पुणे : बिबवेवाडी अप्पर व्हीआयटी कॉलेज परिसरामध्ये टवाळखोरांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे, बिबेवाडी पोलिसांनी यासंदर्भात तीन जणांना ताब्यात घेतले आहे, वाहनांची तोडफोड कुठल्या कारणासाठी करण्यात आली हे स्पष्ट झाले नाही, परंतु बिबेवाडी पोलिसांनी या संदर्भात तीन आरोपींना अटक केली आहे, रात्री दीड वाजताच्या सुमारास एका दुचाकीवरून तीन टोळक्यांनी धारदार हत्यार हातात घेऊन गाड्यांची तोडफोड केली आहे अशी माहिती येतील स्थानिक नागरिक यांनी दबक्या आवाजात दिली, व पोलिसांकडूनही अशी माहिती मिळाली
एक दिवस अगोदर या परिसरामध्ये भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली होती बिबेवाडी पोलिसांनी गोळीबार प्रकरणी आरोपींना अटक केली होती, पूर्व वैमान्यातून हा गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली होती.
त्यानंतर आता गाड्यांची तोडफोड झाल्याने येथील स्थानिक नागरिक हे प्रचंड घाबरले आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गाड्यांची तोडफोड करणारे गुंड यांच्या विरोधात सहजासहजी लोक तक्रार देत नाही कारण येथील स्थानिक नागरिक यांना घाबरतात हे रात्री येऊन धारदार हत्यारे आणून आरडाओरडा करून या परिसरामध्ये दहशत निर्माण करतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना मारहाणकर्त्यात पोलिसात गेला तर तुझे काही खरे नाही असे म्हणून जिवे मारण्याची धमकी देतात त्यामुळे येथील नागरिक यांची तक्रार देण्यासाठी देखील घाबरतात.
काही नागरिकांचे हे सुद्धा म्हणणे आहे की
बिबेवाडी पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे या परिसरामध्ये नाकाबंदी व नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली पाहिजे जेणेकरून येथील टवाळखोर गुंडांवर बिबेवाडी पोलिसांचे वचक राहील, यासारख्या उपाययोजना बिबेवाडी पोलिसांनी या गुंडांना रोखण्यासाठी केल्या पाहिजे जेणेकरून येथील नागरिकांच्या मनामध्ये भीती राहणार नाही.
पोलीस उपायुक्त परिमंडळ ५,डॉ.राजकुमार शिंदे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बिबेवाडी व्ही आय टी कॉलेज परिसरात २५ वाहनांची तोडफोड झाली आहे, यासंदर्भात बिबेवाडी पोलिसांकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, बिबेवाडी पोलीस पुढील तपास करत आहे.