लोक समाचार – राज राठोड
आंबेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या आंबेगाव बुद्रुक आणि कात्रज परिसरातील किराणा दुकाने व टपऱ्यांवर बंदी असलेला गुटखा व सिगारेट विक्रीसाठी साठवून ठेवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
ही माहिती मिळताच( वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने )यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष पथकासह २५ जून २०२५ रोजी चार ठिकाणी छापा टाकून धडक कारवाई केली. यामध्ये एकूण ४९,९०० रुपये किंमतीचा गुटखा व सिगारेट जप्त करण्यात आला.
या कारवाई मुळे ,आंबेगाव पोलिसांचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे.
या प्रकरणी खालील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे:
१) राहुल प्रकाश संचेती (वय ३२),
२) प्रमोद प्रकाश संचेती (वय ३६),
३) रविंद्र राजकुमार वाकडे (वय २६),
४) सुनिल दगडू सुरवसे (वय २४),
५) प्रशांत बच्चा कुलाल (वय ४१).
या सर्वांविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३२/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत संबंधित कलमे, अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ आणि जाहिरात व वाणिज्य उत्पादन अधिनियम २००३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ पुणे, राहुल आवारे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गुन्हे गजानन चोरमले, तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, बाबासो पाटील, निलेश जमदाडे, अजय कामठे, हरीष गायकवाड, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, अविनाश रेवे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, यांच्या पथकाने केली आहे.