लोक समाचार –राज राठोड
आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने दोन वर्षांपासून मोक्का (गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत फरार असलेल्या कुख्यात आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात मोठे यश मिळवले आहे.
पोलिसांना नवाज निसार सय्यद (वय २३) हा आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ आणि राकेश टेकवडे यांनी १७ जुलै २०२५ रोजी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान १८ जुलै रोजी पहाटे २ वाजता न्यू बायजीपुरा, मुसा चौक, जिन्सी येथे नवाज हा मिळून आला.
अटक केल्यानंतर त्याने आपले नाव, पत्ता सांगून गुन्ह्याची कबुली दिली. तो पुण्यातील संतोषनगर, कात्रज येथे राहत होता. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०७ (खून करण्याचा प्रयत्न), १४३ ते १४९ (गुन्हेगारी जमाव), आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा व ‘मोक्का’ कलमांखाली गंभीर गुन्हा नोंदवलेला आहे.
सदर कारवाई मा. सह पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे (स्वारगेट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आंबेगाव पोलिसांची ही कौशल्यपूर्ण कामगिरी विशेषतः उल्लेखनीय मानली जात आहे.
सदरची कारवाई ,अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे, मिलींद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे शहर व राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शरद झिने आंबेगाव पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, तसेच पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, सुभाष मोरे, हरिश गायकवाड, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकवडे, शिवाजी पोटोळे यांच्या पथकाने केली.