पुणे महानगरपालिकेच्या बेवारस सौचालयामध्ये दारूचे बाटल्या
Lok Samachar – Raj Rathod
पुणे बालाजी नगर धनकवडी पेट्रोल पंपाच्या समोर उडान पुलाच्या खाली असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या शौचालयमध्ये नेमकं चाललंय तरी काय स्थानिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार या शौचालयमध्ये रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसाय चालतो आणि या शौचालयमध्ये, व शेजारी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे, आणि आत मध्ये दारूचे बाटल्या कॉन्डोम चे पाकीट असे पडून आहेत, या परिसरामध्ये ठिकठिकाणी दारूचे बाटल्या कचरा, घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
यासंदर्भात धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे, यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून माहिती मिळाली की सदरचे शौचालय हे धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही, ते ठिकाण कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय मंध्ये येते, अशी माहिती धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठांकडून मिळाली.
कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, परंतु कोंढवा येवलेवाडी क्षेत्रे कार्यालय येथील ऑफिसमध्ये संपर्क केला असता, तेथील स्टाफ घुले यांनी सांगितले बालाजी नगर धनकवडी पंपा समोरील पुलाच्या खाली असलेला भाग ज्या ठिकाणी शौचालय आहे, ते धनकवडी क्षेत्रीय कार्यालय यांच्या कडे येतो, तो आमच्या इथे येत नाही अशी माहिती, कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून सांगण्यात आले.
यातून प्रश्न असा निर्माण होतो की, जनतेच्या पैशातून बांधलेले शौचालय याची स्वच्छता कोण करणार? जर का क्षेत्रीय कार्यालय यांनाच माहिती नाही, की हा भाग कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत आहे.
पुणे महानगरपालिकेने मोठमोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेले आहे, स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे, हे शब्द फक्त भिंती रंगवून स्वतःची पाठ थोपटून घेऊन,पुणे महानगरपालिकेला काय सिद्ध करायचे आहे, हा ही एक प्रश्न निर्माण झाला आहे.
या संदर्भात संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, का पुणे महानगरपालिकेकडून असा गचाळ कारभार पुढेही असाच चालू राहील. असा पुणेकरांचा प्रश्न.
शौचालय मध्ये , सगळीकडे अस्वच्छता आहे दारूच्या बाटल्या कंडोमचे पाकीट आणि स्वच्छता ग्रहाच्या परिसरामध्ये, अक्षरशा दुर्गंधी पसरली आहे, येथील नागरिक व येणारे जाणारे लोक अस्वच्छता आणि या स्वच्छतागृहांमध्ये चालणारे वेश्याव्यवसाय सारखा प्रकार याला जबाबदार कोण, भिंतीवर मोठ मोठ्या अक्षरांमध्ये स्वच्छ पुणे आणि सुंदर पुणे पुणे महानगरपालिका गिरवते आणि तेथेच दुर्लक्ष होत असेल व त्या गोष्टीमुळे परिसरामध्ये रोगराई पसरत असेल तर त्याला जबाबदार कोण, संबंधित क्षेत्रीय अधिकारी का पुणे महानगरपालिका? या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचा प्रश्न आहे, या बेवारस शौचालय याचा मालक कोणी आहे की नाही.
धनकवडी क्षेत्र कार्यालय म्हणत असेल की हे आमच्याकडे नाही, ते शौचालय कोंडवा येवलेवाडी कडे आहे आणि कोंढवा येवलेवाडी क्षेत्रे कार्यालय यांच्याकडून म्हणण्यात येते की ते शौचालय आमच्याकडे नाही ते धनकवडी कडे आहे.
या हलगर्जीपणाच्या उत्तरांना जबाबदार कोण, पुणे महानगरपालिका दरवर्षी शौचालयाच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च केल्या जातो, मग तो खर्च नेमका जातो कुठे स्वच्छतेच्या नावाखाली पुणेकरांची लूट होत आहे का यातून हा एक प्रश्न निर्माण होतो,
विजय विठ्ठलराव क्षीरसागर (पतित पावन संघटना पुणे शहर, अध्यक्ष खडकवासला विभाग)
यांनी सांगितले या ठिकाणी दोन वेगवेगळे स्वच्छतागृह आहेत,त्यातून महिलांचे स्वच्छतागृह हे, कुलूप लावून बंद ठेवले आहे, जर का महिलांसाठी बांधण्यात आलेले शौचालय कुलूप लावून बंद ठेवायचे होते तर सामान्य नागरिकांचे पैसे खर्च करून पुणे महानगरपालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृह का बनवले आहे, बंद ठेवायचे होते तर बांधले कशाला आणि खर्च कशासाठी केला आहे,व यापेक्षा भयावा परिस्थिती म्हणजे, त्याच ठिकाणी असलेल्या पुरुषांच्या शौचालयामध्ये दारूचे बाटल्या कंडोम चे पाकिटे असे त्या ठिकाणी पडून आहे आणि भरपूर प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे याचा जबाबदार कोण, या शौचालय मध्ये रात्रीच्या वेळी वेश्याव्यवसाय होत असल्याची देखील माहिती आहे,
हसन राजूभाई शेख, ( सामाजिक कार्यकर्ते )रा.धनकवडी यांनी सांगितले की हे शौचालय स्वच्छतागृह वेळोवेळी स्वच्छ न केल्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे, व या परिसतातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तरी संबंधित अधिकाऱ्याने लवकरात लवकर येथील स्वच्छता करून घेणे व या शौचालयामध्ये रात्रीच्या वेळी जे काय, प्रकार चालू आहेत ते बंद करण्यात यावे.
यासंदर्भात सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांना विचारले असता, गौड यांनी सांगितले या ठिकाणी असे काही प्रकार चालू असतील तर आम्ही, सदर ठिकाणी असलेल्या शौचालय परिसरामध्ये पेट्रोलिंग चे गस्त वाढवून, कारवाई करू.