पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी नवीन सुविधा : लिफ्ट आणि थंड पाण्याची सोय
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेचा पुणे विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मंगळवार, १० जून २०२५ रोजी पुणे रेल्वे स्थानकावर नवीन लिफ्ट आणि पिण्याच्या पाण्याचा कूलर प्रवाशांच्या सेवेसाठी बसवण्यात आला आहे.
या नवीन सुविधांमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरील सर्क्युलेटिंग एरियामध्ये एक लिफ्ट आणि प्लॅटफॉर्म क्रमांक,१ वर एक लिफ्ट बसवण्यात आली आहे. याशिवाय, प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक नवीन पाण्याचा कूलरही उपलब्ध करून देण्यात आला आहे,
या सुविधांमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवासी आणि महिला प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे, कारण त्यांना आता प्लॅटफॉर्म बदलणे आणि पाण्याची सोय करणे अधिक सुलभ होईल,
या लोकार्पण सोहळ्याला भारत सरकारचे केंद्रीय नागरी उड्डाण वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री, मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी, मंडल रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, अपर मंडल रेल्वे व्यवस्थापक पी. यू. जाधव, वरिष्ठ मंडल वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार पाठक, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता (सामान्य) पराग आकणूरवार आणि इतर विभागीय अधिकारी उपस्थित होते.
पुणे रेल्वे विभाग प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकांना अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. या नवीन सुविधांमुळे प्रवाशांना अधिक चांगल्या आणि सुलभ सेवा मिळतील अशी अपेक्षा आहे.