महानगरपालिकेकडून पालखी मार्गावरील कामांचा आढावा: पुणे शहरात तयारी अंतिम टप्प्यात
लोक समाचार – राज राठोड
पुणे शहरातून जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांवर सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी, पुणे अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश दिवटे यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारी ३ वाजता ही बैठक पार पडली, ज्यात विविध विभागांचे प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत ओमप्रकाश दिवटे यांनी पालखी शहरात दाखल होण्यापूर्वीची संबंधित कामांची सद्यस्थिती जाणून घेतली.
त्यांनी सर्व खातेप्रमुखांना उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पालखी मार्ग सुस्थितीत असावा, वारकऱ्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध असाव्यात, तसेच स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली जावी, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी नगरसचिव योगिता भोसले, मुख्य उद्यान अधिकारी अशोक घोरपडे, मुख्य अभियंता (पथ) अनिरुद्ध पावसकर, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संदीप कदम, उप आयुक्त सुनील बल्लाळ, सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे यांच्यासह इतर संबंधित खातेप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिका प्रशासनाने पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व तयारी वेगाने सुरू केली आहे, जेणेकरून भाविक वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ,महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना या बैठकी मध्ये सूचना देण्यात आले आहेत.