पुण्यात आकाश थोरात टोळीवर मोक्का कारवाई – जुन्या वादातून युवकाची हत्या
LOK SAMCHAR – RAJ RATHOD
पुणे शहरातील आंबेगाव परिसरात ५ एप्रिल २०२५ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र दुचाकीवरून जात असताना, आकाश थोरात या टोळी प्रमुखाच्या इशाऱ्यावर सहा विधीसंघर्षीत बालकांसह इतर टोळी सदस्यांनी त्यांना अडवून धारदार शस्त्रांनी वार केले.
फिर्यादी व त्यांचा मित्र यांना “तुमचे मित्र आमच्या टोळीच्या सदस्याला मारहाण करतात, आता तुम्हाला सोडणार नाही, असे धमकावत टोळीतील सदस्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले तर त्यांचा मित्र उपचारादरम्यान मृत्यू झाला,
या प्रकरणात आकाश भरत थोरात (वय ३२), अजित धनावडे (पाहिजे आरोपी), आदित्य शिंदे, रोहित कचरे, विशाल उर्फ मोड्या गणेचारी व सहा अल्पवयीन गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर याआधीही २०१५ पासून गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे नोंद आहेत. टोळीचा उद्देश दहशत निर्माण करून आर्थिक फायदा मिळविण्याचा असल्याचे तपासात उघड झाले आहे.
सदर घटनेनंतर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. यावर दि. ३ जून २०२५ रोजी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे यांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता या टोळीविरुद्ध ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
पोलीस तपास अधिक गतीने सुरू असून इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. शहरातील टोळीगिरीवर आळा बसवण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे.
सदरची उल्लेखनिय कामगीरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर, अतुल नवगिरे, सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग तथा अतिरिक्त कार्यभार स्वागेट विभाग, पुणे शहर राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस स्टेशन, गजानन चोरमुले पोलीस निरीक्षक (गुन्हे), भोजलिंग दोडमिसे, सहा. पोलीस निरीक्षक, श्री युवराज शिंदे पोलीस उप निरीक्षक व स.पो. फौजदार चंद्रकांत माने, पो. हवा. ७४२१ ढमढेरे, पो. शि. ८१३८ अजय सावंत, पो. शि. आबासो खाडे यांनी केली आहे.