अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांवर आंबेगाव पोलिसांची कारवाई – अनधिकृत बांधकामावर JCB चालवली
लोक समाचार –राज राठोड
पुणे – आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कात्रज परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. साईनगर गल्ली क्रमांक ३, गगनगिरी कमानीजवळ सच्चाई माता परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली.
महानगरपालिकेच्या मदतीने सदर इसमाचे अनधिकृत घर तसेच शेजारी बांधलेले पत्र्याचे शेड JCB लावून जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यांना चाप बसण्याची शक्यता आहे.
अवैध दारू विक्रीबाबत मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कार्यवाही राबवली. पोलीस आणि महापालिकेच्या संयुक्त मोहिमेमुळे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरात यापूर्वीही अशा प्रकार घडले असून भविष्यात अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आंबेगाव पोलिसांनी दिला आहे.