लोक समाचार –राज राठोड
पुण्यातील आंबेगाव परिसरात दिनांक १५ जुलै २०२५ रोजी ४० लाखांच्या रोख रकमेसह जबरी चोरी झाल्याची घटना घडली होती. फिर्यादी अभिजीत विष्णू पवार हे बांधकाम व्यावसायिकांकडून मालाच्या बिलाचे पैसे घेण्यासाठी पुण्यात आले असता, त्यांच्या मित्राकडे दिलेली पैशाची बॅग थार गाडीमधून आलेल्या तिघांनी हिसकावून नेली.
घटनेनंतर केवळ २४ तासांत आंबेगाव पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत जबरी चोरीतील आरोपींचा छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे प्रदीप डोईफोडे, मंगेश ढोणे (फिर्यादीचा मित्र) आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक करण्यात आली.
अटक आरोपींकडून ९ लाख ३५ हजार रुपये रोख, पाच मोबाईल, चोरीसाठी वापरलेली काळ्या रंगाची महिंद्रा थार गाडी आणि चार बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आल्या. अधिक तपासात मंगेश ढोणेनेच गुन्ह्याची माहिती आरोपींना देऊन कट रचल्याचे उघड झाले आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी मा.श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.श्री. संजय बनसोडे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. श्री निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शखा पुणे शहर, मा.श्री. मिलींद मोहिते पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पुणे शहर व मा.श्री. राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विजय कुंभार वपोनि, खंडणी विरोधी पथक-२, पुणे शहर, श्री अंजुम बागवान, वपोनि, गुन्हे शाखा, युनिट-२ पुणे शहर, तसेच आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले, गुन्हे शाखा युनिट २ चे सहा. पोलीस निरीक्षक, श्री अमोल रसाळ, अशिष कवठेकर, आंबेगाव पोलीस ठाणेचे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. मोहन कळमकर, सपोफौ शैलेंद्र साठे, पोलीस हवालदार गणेश दुधाने, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, स्मिता पवार, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, पोलीस अंमलदार आबासो खाडे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवा पाटोळे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, राजेश टेकावडे, हरिष गायकवाड तसेच अवदुत जमदाडे पोउआ परि-०२ कार्यालय पुणे शहर व गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस अंमलदार ओंकार कुंभार, अमोल सरडे व पवन भोसले यांनी केली आहे.